राजापूरातील कुवेशी गावात वासरावर बिबट्याचा हल्ला, सरपंच मोनिका कांबळी यांनी केली घटनास्थळी जाऊन पाहणी
राजापूर तालुक्यातील कुवेशी गावात बळवंत राम शिर्के यांच्या घराशेजारी प्रभाकर लक्ष्मण लिंगायत यांची गुरे झाडाखाली उभी असता त्यातील एका गाईच्या वासरावर बिबट्याने गुरुवारी रात्री 9:30 ते 10 च्या दरम्याने हल्ला केला. त्यात गाईच्या वासराच्या मानेला ईजा झाली असून सदर बळवंत शिर्के व त्यांच्या पत्नीने सदर बिबट्याला पळवून लावत बिबट्याच्या तावडीतून वासराला सोडवून आणले. त्यानंतर घरी वासराला ठेवले. सदरची माहिती फोनद्वारे गावचे सरपंच कु मोनिका मनोहर कांबळी याना कळविण्यात आली. सरपंच मोनिका कांबळी व तंटामुक्ती अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोहर वासुदेव कांबळी यांनी प्रभाकर लक्ष्मण लिंगायत यांच्या घरी जाऊन माहिती देऊन बळवंत शिर्के यांच्या घरी जाऊन सदर गाईच्या वासराची पाहणी करून संबंधित विभागीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ यशवंते यांच्याशी संपर्क केला. डॉक्टर यशवंते यांनी घटनास्थळी येऊन वासराची तपासणी करून लगेच उपचार करतो असे सांगितले. 15 दिवसांपूर्वी दिवसा ढवळ्या बळवंत शिर्के यांच्या गाईचे वासरू पाडा याच्यावर रानात हल्ला करून मारून खाल्ले. यामुळे पूर्ण गावात बिबट्याच्या हल्ल्याच्या दहशतीमुळे गावात शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन वन विभागाने गंभीर दखल घ्यावी अशी शेतकरी ग्रामस्थांची मागणी आहे. वन विभागाने लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सरपंच मोनिका कांबळी यांनी केली आहे.
Comments
Post a Comment