कोकण रेल्वेचे शिल्पकार यांना भावपूर्ण आदरांजली..
शुक्रवार दिनांक २१ जानेवारी, कोकण रेल्वेचे सर्वेसर्वा कोकण रेल्वे मार्गाचे शिल्पकार आदरणीय प्रा. श्री. मधू दंडवते यांची ९८ वी जयंती कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे संघटनेचे प्रमुख सल्लागार श्री राजू कांबळे याच्या अधिपत्याखाली आदरांजली देत ठाणे रेल्वे स्थानक ठिकाणी स्मृती दिन आयोजिला होता.
त्यावेळी खालील सभासदांनी उपस्थिती दर्शविली. श्री. सुजीत लोंढे, श्री. संभाजी ताम्हणकर, श्री. रविंद्र बद्रिके, श्री. दर्शन शेट्ये, श्री शरद धाडवे, श्री. अनंत लोके, श्री. नामदेव चव्हाण, श्री. अजिंक्य नार्वेकर.
आजही कोकणी युवक वर्गात श्री दंडवते यांचे परोपकार आणि कोकण मार्गावरील दूरदृष्टी जाणवली. कोकण रेल्वे मार्गाचे योगदान हे भारतीय रेल्वेतील उपयुक्त तसेच महत्त्वाचा मार्ग समजला जातो.
Comments
Post a Comment