पोसरे येथे एकाच मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण:
तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे एकास दोघांनी मारहाण यामध्ये एकजण जखमी झाला आहे. राजेश श्रीधर मोहिते (रा. पोसरे, बौद्धवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद राजेश मोहिते यांनी दिली असून मनोहर गंगाराम मोहिते, संदेश जयराम मोहिते (दोघेही रा. पोसरे, बौद्धवाडी) असे गुन्हा झालेल्या दोघांची नावे आहेत. राजेश हे १० जानेवारी रोजी मोलमजूरीचे काम आटपून घरी येत असताना पोसरे बौद्धवाडी येथील पुलावर मनोहर व संदेश या दोघांनी राजेशला धक्काबुक्की करत काठीने मारहाण केली, यामध्ये राजेश हा जखमी झाला आहे. याची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.
Comments
Post a Comment