अवैधरित्या खैरांच्या झाडांची कत्तल
दापोली:
खैर , सागवान आदी काही महत्वाची झाडे संरक्षित वन यादीत मोडतात. वनविभागाच्या परवानगी शिवाय या झाडांची तोड करणे गुन्हा आहे. मात्र , तरीही या नियमांना हरताळ फासत अवैधरित्या वृक्षतोड करून
जंगले संपवण्याचा उद्योग कोकणात काही ठिकाणी छुप्या पद्धतीने केला जातो. असाच एक या प्रकार कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यात चिखलगाव मळे परिसरात चालू होता. सगळ्याविषयी
सावित्री भिकू पांदे , लक्ष्मी सहदेव पांदे , दोन्ही रा.वरचीवाडी , मळे , ता. दापोली यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाणे येथे तोंडी तक्रार दिली होती. याची दखल घेत दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने प्रभारी
पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ , पोलीस हेड कांस्टेबल राजू मोहिते आदींनी कारवाई केली.
Comments
Post a Comment