साखरी नाटे येथील मच्छिमारांच्या उपोषणाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिका-यांचा पाठिंबा

राजापूर तालुक्यातील सागरी नाटे येथील पर्ससीन नेट धारक मच्छीमार बांधवांचे साखरीनाटे मच्छिमार अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे. अन्यायी दंड कारवाई, चार महीन्याचा अल्प मच्छीमारी कालावधी व इतर पर्ससीनधारक मच्छीमारांच्या समस्या कायमच्या निवारण्यासाठी साखळी उपोषणाचा निर्धार करण्यात आला आहे. या उपोषणाला राजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य आबा आडिवरेकर यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला. तसेच मच्छिमारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे अभिवचनही मच्छिमार बांधवांना दिले आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रतिक मठकर, तालुका सरचिटणीस, जैतापूर ग्रामपंचायत सदस्य सरफराज काझी, जिल्हा युवक उपाध्यक्ष मनिष लिंगायत, सोशल मीडिया प्रमुख प्रशांत पवार, कॉंग्रेस नेते जितेंद्र खामकर, धाऊलवल्ली येथील व्यावसायिक पिंट्या कोठारकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Comments