अखेर, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

खेड तालुक्यातील ऐनवली येथे दोन रिक्षांची समोरासमोर धडक झाल्याने एक महिला जखमी झाली. हा अपघात दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या
सुमारास घडला होता. या प्रकरणी रिक्षा चालक सचिन बारकू आखाडे (३४, रा. खेड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ऐनवली गावानजीक एका वळणावर हुंबरी येथून खेडकडे येणारी रिक्षा
(एमएच ०८, ई ७२९३) आणि समोरुन आलेली रिक्षा (एमएच ०८ , एक्यू ४२९०) यांची टक्कर झाली. खेडकडे येणाऱ्या रिक्षातील सुप्रिया सुरेंद्र पाटील (रा.
मुंबई ) यात जखमी झाल्या.

Comments