स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लिखाण करणाऱ्या समाजकंटकाला अटक करा*

*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लिखाण करणाऱ्या समाजकंटकाला अटक करा*

*जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन देणार- अनिकेत पटवर्धन*

*रत्नागिरी* : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि स्वातंत्र्ययोद्धे घडविण्यात ज्यांनी योगदान दिले त्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी वाईट भाषेत लिहून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकाला अटक क्रआणी त्याला कडक शासन करा, अशी मागणी आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांची भेट घेणार असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी पत्रकारांना दिली.

यासंदर्भात त्यांनी सांगितले की आज सायंकाळी फेसबुकद्वारे एका युवकाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवहेलना होईल, असे लिखाण केले आहे. तसेच त्यातून समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अशा पद्धतीने लिखाण करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाविरोधात तत्काळ गुन्हा नोंदवून त्याला अटक करून, शासन व्हावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा करत आहे.

ही मागणी उद्या शुक्रवारी दि. 28 रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे भेटून करण्यात येणार आहे.

वीर सावरकरांनी रत्नागिरी शहरामध्ये शंभर वर्षापूर्वी हिंदू समाजाला एकत्र आणतानाच इंग्रजांविरोधात रणशिंग फुंकले होते. जातीपातीच्या बेड्या तोडून मराठी भाषेत अनेक सुधारणा, हिंदूंचे ऐक्य, सामाजिक सुधारणा यासह भारताला स्वातंत्र्य मिळून देण्याकरिता प्रचंड मोठे योगदान दिले आहे. त्यांचे हे योगदान रत्नागिरीकर आणि भारतवासी कदापि विसरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे लिखाण केल्याने सावरकर प्रेमी  लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करून त्याला शासन व्हावे, अशी तमाम सावरकरप्रेमी लोकांची मागणी आहे. अशीच मागणी भारतीय जनता युवा मोर्चा करत असून या संदर्भात उद्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर गर्ग यांची भेट घेणार आहोत, असे पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

Comments