रत्नागिरी:आग लागून बागेचे सुमारे सहा लाखाचे नुकसान!

लांजा शहरातील धुंदरे येथे असलेल्या डॉ. मनोहर तिरमारे यांच्या काजू आंबा नारळाच्या बागेला लागलेल्या आगीत बाग पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. डॉ. तिरमारे यांची धुंदरे येथे वांजूदेवीनजीक
आंबा काजू नारळाची बाग आहे. तिरमारे यांनी वैद्यकीय व्यवसाय सांभाळून स्वकष्टाने त्यानी माळरानावर ही बागायत केली होती. बागायती उत्पन्न देणाऱ्या या बागेला अचानक आग लागल्याने, २०० काजू , २०० आंबा , नारळाची ७० झाडे , २०० ड्रॅगन फ्रूट कलमे होरपळली. बहुतांशी कलमे जळून खाक झाली. यासह पंप , पाईप , दोन एकरवर असलेले ढीबक सिंचन सिस्टीम , एक हजार फूट नेट , सागवान लाकूड इत्यादी साहित्य या आगीमध्ये भस्मसात झाले. याठिकाणी डॉ. तिरमारे यांनी कोरोना काळात दोन एकरमध्ये आले आणि हळदीची लागवडदेखील केली होती.

Comments