न्यायमूर्तींच्या चेंबरमध्ये साप शिरल्याने खळबळ

    

     मुंबई 22 जानेवारी:* मुंबई हायकोर्टात न्यायमूर्तींच्याच चेंबरमध्ये साप शिरल्याने काही वेळ गोंधळ उडाला. हा साप चार ते पाच फूट लांबीचा होता. न्यायमूर्ती बोरकर यांच्या चेंबरमध्ये साप आढळून आला. या घटनेनंतर तात्काळ रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. काही वेळातच रेस्क्यू टीम मुंबई हायकोर्टात न्यायमूर्तींच्या चेंबरमध्ये पोहोचली. शर्थीच्या प्रयत्नांनंतर सापाला पकडण्यात यश आले.  

याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला. सर्पमित्रांनी त्या सापाला पकडले. साप बिनविषारी असल्याची माहिती सर्पमित्रांकडून देण्यात आली. ज्यावेळी साप चेंबरमध्ये शिरला, त्यावेळी न्यायमूर्ती बोरकर हे आपल्या चेंबरमध्ये उपस्थित नव्हते. त्या सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र चागलेच व्हायरल होत आहेत


Comments