देवरुख एस टी आगार प्रमुखांविरोधात देवरुखातील महिला शक्ती एकवटली


त्वरित कारवाई करण्याची महिलांची मागणी

देवरुख पोलीस निरिक्षकांकडे नेवेदन सादर

देवरुख येथील एस.टी. आगार व्यवस्थापकांन विरोधात महिला शक्ती एकवटली असून मंगळवार दिनांक १८ जानेवारी रोजी देवरुख पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.आगार व्यवस्थापक सागर गाडे यांनी ब्राह्मण समाजातील महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद मंगळवारी उमटले

याविरोधात भाजप आणि शिवसेनेच्या महिलांनी एकत्र येत गाडे यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देवरुख पोलिस निरिक्षक बाळकृष्ण जाधव यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनाची आपण गांभीर्याने दखल घेऊ असे आश्वासन पोलिस निरीक्षक जाधव यांनी दिले.

या निवेदनात, कामावर परत या असे प्रबोधन करण्यासाठी गाडे हे १४ जानेवारी रोजी सकाळी खालची आळी येथील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी प्रबोधनाच्या नावाखाली त्यांनी ब्राह्मण समाजातील महिलांविषयी अवमानास्पद वक्तव्य केले. हे कृत्य समाजात तेढ निर्माण करणारे असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर १०० पेक्षा अधिक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदन देतेवेळी शिवसेनेकडुन जिल्हा संघटक वेदा फडके, भाजप कडून ज्येष्ठ नेत्या रश्मी कदम, तालुकाध्यक्ष कोमल रहाटे, नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, माजी नगराध्यक्ष स्वाती राजवाडे, आंबव सरपंच माधवी अधटराव, नगरसेविका रेश्मा किर्वे, मनस्वी आंबेकर,वैभवी परशुराम,नेत्रा आठल्ये, स्नेहा फाटक, साक्षी पाठक, अपर्णा गानु अश्विनी पाताडे आदी महिला उपस्थित होत्या.


  

Comments