राजापुर तालुक्यतील तें तीन जण अद्यापही नापत्ता पोलीसांकडून पुन्हा तपास सुरु

गेल्या काही वर्षात राजापूर तालुक्यातुन रायपाटण, दोनिवडे व मिळंद येथील बेपत्ता झालेल्या त्या तीन व्यक्तींचा अद्यापही शोध न लागल्याने पुन्हा एकदा राजापूर पोलीसांनी या बेपत्ता व्यक्तींच्या तपासाची मोहिम हाती घेतली आहे. याबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास
वा या व्यक्ती आढळून आल्यास त्यांनी राजापूर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी केले आहे. 

राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील प्रसाद प्रभाकर देशपांडे हा १९ वर्षीय तरूण बेपत्ता झाला असून तशी नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायपाटण येथील प्रसाद प्रभाकर देशपांडे हा दि. १२ ऑक्टोबर २००४ रोजी घरातून पाचल हायस्कूलला क्लासला जातो असे सांगून निघून गेला
होता. तेव्हापासून तो घरी परत आलेला नाही. प्रसाद याची उंची ५ फूट ५ इंच, रंग -निमगोरा, केस-काळे, नेसणीस हाफ शर्ट जीन्स पॅन्ट, असे आहे. या वर्णनाची व्यक्ती मिळून आल्यास राजापूर पोलीस
स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर राजापूर तालुक्यातील मिळंद येथील आत्माराम कृष्णा आयरे .४५ हे नापत्ता असून तशी नोंद राजापूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.


मिळंद येथील आत्माराम कृष्णा आयरे हे दि. ४ जुलै २००० रोजी घरातील व्यक्तीना शेजारच्या वाडीमध्ये जाऊन येतो असे सांगून गेले तेव्हापासून ते घरी परत आले नाहीत. सदर नापत्ता व्यक्तीचे वर्णन
उंची ५ फूट, अंगाणे सडपातळ, रंग काळा, पाठीस पोक, नेसणीस हाफ पॅन्ट हाफ शर्ट असे आहे. तरी वरील वर्णनाची व्यक्ती मिळून आल्यास राजापूर पोलीस स्थानकाशी संपर्प साधावा, असे आवाहन राजापूर पोलिसांनी केले आहे.

राजापूर तालुक्यातील दोनिवडे, गुरववाडी येथील किशोर तानाजी गुरव .३५ हे नापत्ता असून तशी नोंद राजापूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. सदर व्यक्ती आढळल्यास राजापूर पोलीस
ठाण्याशी संपर्प साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले
आहे.
 
दोनिवडे, गुरववाडी येथील किशोर तानाजी गुरव हे दि. १० जानेवारी २०१४ रोजी घरात कोणाला काही न सांगता निघून गेले तेव्हापासून ते घरी परत आले नाहीत. नापत्ता किशोर गुरव यांची उंची ५ फूट ५ इंच, मजबूत बांधा, रंग निमगोरा, केस काळे, मिशी काळी बारीक असे
आहे. वरील वर्णनाची नापत्ता व्यक्ती मिळून आल्यास राजापूर पोलीस
स्थानकाशी संपर्प साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर व पोलीस हेडकाँस्टेंबर के.आर.तळेकर यांनी केले आहे.

Comments