किरण सामंत यांच्या मध्यस्थीमुळे लांज्यातील आंदोलन स्थगित
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी कुक्कुटपालन कुंभारवाडी या ठिकाणच्या रहिवासी आणि नागरिक तसेच या प्रभागाच्या नगरसेविका दुर्वा प्रसाद भाईशेट्ये यांनी बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे सुमारे अर्धा तास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान खड्डेमय बनलेल्या लांजा शहरातील चार ते पाच कि.मी. अंतराच्या रस्त्याच्या २० जानेवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल, असे आंदोलनकर्त्या नागरिकांना आश्वासन देत आंदोलन तूर्त मागे घेण्याची विनंती किरण सामंत यांनी केली. त्यांच्या शब्दाला मान देत नागरिकांनी आंदोलन तूर्तास मागे घेतले.
Comments
Post a Comment