सिंधू-रत्न योजनेतून वैयक्तीक लाभाच्या योजना देण्यात येणार, कुवरबाव येथे निर्वाचन भवन, मालगूंड येथे प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार: मंत्री उदय सामंत यांची माहीती
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या संदर्भात आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार आयोजित केली होती. यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील जिल्हा क्रीडा संकुलासाठी शासनाने सुमारे २३ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. त्यापैकी १० कोटी पेक्षा अधिक रक्कम तातडीने मिळणार आहे. विमानतळासाठी आणखी लागणारे सुमारे ७२ कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव फायनान्स डिपार्टमेंटकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे तो ही प्रश्न मार्गी लागेल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून झाडगाव येथे मत्स्य बिज केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिपळूण मधील एनरॉन निरामय हॉस्पिटल प्रशासनाने ताब्यात घेण्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या हॉस्पिटलच्या डागडूजीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी देण्यात येईल. रत्नागिरीतील कुवारबाव येथे ४ एकर क्षेत्रात निर्वाचन आयोग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील रत्न-सिंधू योजनेत आता वैयक्तीक लाभाच्या योजना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये महिला बचत गट, शेतकरी गट, आंबा बागायतदार यांचा समावेश असेल. मालगूंड येथे ४१ एकरच्या जमिन क्षेत्रात प्राणी संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी सविस्तर माहीती मंत्री उदय सामंत यान्नी दिली.
Comments
Post a Comment