कासवाचे होणार सॅटेलाईट टॅगिंग

कासव हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक असल्याने आता वन विभागाकडून कासवाचे सॅटेलाईट टॅगिंग केले जाणार आहे. याद्वारे ऑलिव्ह रिडले जातीच्या मादी कासवाचा जगभरातील जलप्रवास उलगडू शकणार आहे. ऑलिव्ह रिडले मादीच्या सॅटेलाईट टॅगिंगसाठी रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पाच किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील
आंजर्ले दापोली , मंडणगडमधील वेळास आणि रायगड जिल्ह्यातील ३ अशी एकूण पाच ठिकाणे निवडण्यात आली आहेत. कासव हा एक उभयचर प्राणी आहे. कासवांचे आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त असते. त्यामुळे समुद्री कासवाची मादी ही अंडी देण्यासाठी किती दूर जाऊ शकते , या बाबत या सॅटेलाईट टॅगिंगमधून ठोस अशी माहिती उपलब्ध होणार आहे. समुद्री कासवाची मादी ही जगभरातील कोणत्याही देशातील समुद्र किनाऱ्यावर अंडी घालण्यास जाऊ शकते , अशी माहिती पुढे येत आहे. सॅटेलाईट टॅगिंगमुळे या वर शिक्कामोर्तब होऊन अधिक माहिती उपलब्ध होणार आहे. दि. २५ ते २७ जानेवारी या कालावधीमध्ये , ऑलिव्ह रिडले समुद्री कासव मादीचे सॅटेलाईट टॅगिंग डब्लूएलएलची टॅगिंग
टीम यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. यासाठी कांदळवन कक्ष टीम मौजे वेळास मंडणगड व मौजे आंजलें दापोली येथे दाखल झाली असून या साठी डॉ.सुरेश कुमार दि. २४ रोजी दाखल झाले आहेत.

Comments