रत्नागिरीत 'येथे' सापडले दीड वर्षीय बालक बेवारस स्थितीत

रत्नागिरी:
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गाव पऱ्या येथे सुमारे दीड वर्षीय स्त्री जातीचे बालक बेवारस स्थितीत मिळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या बालकाला ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले असून सध्या त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देवरुख- रत्नागिरी
मार्गावर पांगरी गाव वसलेला आहे. पांगरी गावचे सरपंच सुनील म्हदे हे मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतीकडे येत असतानाच त्यांना गाव
पर्या येथे जंगलमय भागात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. हा प्रकार त्यांनी ग्रामस्थांच्या कानावर घातला. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन आजूबाजूच्या भागाची पाहणी केली असता एक दीड वर्षांचे बालक दिसून आले. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी देवरुख पोलिसांना दिली. तापासाअंती यातील नेमके प्रकरण पुढे येणार आहे.

Comments