वाशिष्ठी नदीपात्रात तरुणाची आत्महत्या

खेड-२५/०१/२०२२:
खेड तालुक्यातील सोनगाव माठवाडी येथील एका ३५ वर्षीय तरुणाने वाशिष्ठी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली. मात्र त्याने आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.समीर प्रकाश खसासे असे त्या आत्महत्या केलेल्या
तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह सोनगाव भोईवाडी येथील नदी किनाऱ्याच्या झुडुपात आढळून आला. याबाबतची खबर महेंद्र मंगेश खसासे (३५) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार पोलिसांनी
आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Comments