राजापूरातील साखरी नाटे येथील मच्छिमार बांधवांचे उपोषण; माजी आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, नगराध्यक्ष जमीर खलिफेंची उपोषण स्थळी भेट, मच्छीमारांशी साधला संवाद
शासनाच्या पर्ससीनबाबतच्या पूर्वग्रह दुषित व आडमुठे धोरणाबद्दल राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथील मच्छिमारांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडण्यात येत आहे. मागिल कित्येक वर्षांच्या वहिवाटीनुसार पर्ससीन धारकांना माहे सप्टेंबर ते मे पर्यंत महाराष्ट्र जलधी क्षेत्रात (१० वावाच्या बाहेर) मच्छिमारिस परवानगी होती, ती द्यावी. महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्राबाहेर मच्छीमारी करुन येणा-या पर्ससीन बोटींना बंदरात ये-जा करायला व मासळी उतरायला माहे सप्टेंबर ते मे पर्यंत परवानगी देऊन भारताच्या संविधानात दिलेले मुलभुत अधिकार अबाधित ठेवावेत. पर्ससीन नौकांना नविन मासेमारी देण्याबरोबर जुन्या मासेमारी परवान्यांचे नुतनीकरण करुन देण्यात यावे. पर्ससीन नौकांवर एकतर्फी कारवाई बंद करावी. सर्व मासेमारी प्रकारांचा सखोल अभ्यास झाल्याशिवाय पर्ससीन नौकांवर कोणतीही कारवाई करु नये. अशा विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर साखरी नाटे येथील मच्छिमार उपोषणाला बसले आहेत. या उपोषण स्थळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, माजी विधान परिषद आमदार अॅड.हुस्नबानू खलिफे, राजापूरचे नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे, राजापूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक वसंत आंबेलकर, शिवणे खुर्द ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश मराठे आदींनी भेट दिली. तसेच मच्छिमार बांधवांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले.
यावेळी शाअदत हबीब, मलिक गडकरी, मजिद सायेकर, शुजा कोतवडकर, नदीम कोतवडकर, इशराक भाटकर, मुजाहिद हुना, सल्लाऊद्दीन हातवडकर, मोहसिन कोतवडकर, कलिम तमके, सलमान तमके, फैरोज भाटकर, मजिदशेठ सोलकर, अशगर बांगी, सरपंच नौशाद धालवेलकर, आसिफ म्हसकर, गालीब हुना, आदिल म्हसकर, तौसिफ गोवळकर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment