एसटीचा गाडा सुरळीत करण्यासाठी आजपासून टप्प्याटप्यात राज्यातील एसटीच्या आठ विभागांत ४०० खासगी चालकाची भरती
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प असलेली एसटी सुरळीत करण्यासाठी खासगी कंत्राटी चालकांची नियुक्ती एसटीचे चालक म्हणून केली जाणार आहे. त्यानुसार रविवारपासून टप्प्याटप्यात राज्यातील एसटीच्या आठ विभागांत ४०० खासगी चालक नियुक्त होत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.सुमारे तीन हजारांपर्यंत कंत्राटी चालक भरती करण्याचा विचार महामंडळाचा आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला संप अद्यापही मिटलेला नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी प्रवासी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत आहे.
Comments
Post a Comment