रायपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजीत शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न
राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत रायपाटण आयोजित शेतकरी मेळावा दिनांक १ जानेवारी रोजी संपन्न झाला. त्यास रायपाटण गावचे सरपंच महेंद्र गांगण, सर्व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच सर्व रायपाटण मधील शेतकरी वर्ग उपस्थित होते. सदर शेतकरी मेळाव्याला श्री.शिंदे ( मंडळ कृषी अधिकारी पाचल) व श्री.मदने ( कृषी अधिकारी पाचल ) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेती पद्धती व कृषी योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment