विषारी औषध प्राशन केलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या युवकाचा उपचारादम्यान कोल्हापूर येथील सी. पी. आर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. प्रेम संतोष पवार (१९, रा. फणसवळे , रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या
युवकाचे नाव आहे. याबाबत ग्रामीण पोलीस
स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. २ जानेवारी रोजी पहाटे ५. ३० वाजण्याचा सुमारास राहत्या घरी अज्ञात कारणातून ग्रामोझोन नावाचे विषारी औषध प्राशन केले होते. त्याला अस्वस्थ वाटू लागल्यावर नातेवाइकांनी त्याला
प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सी. पी. आर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते , परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार संतोष कांबळे करत आहेत.

Comments