रत्नागिरी शहरात पुन्हा अवैध टप-या, भाजी विक्रेते, फळ विक्रेते जिकडे तिकडे उभे राहिले, नगर परिषदेची कारवाई केवळ फार्स, गतवर्षीच्या कारवाईमागे नेमके धोरण काय होते?

रत्नागिरी नगर परिषदेने वर्षभरापुर्वी शहरातील अवैध टप-या, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आदींवर कारवाई केली होती आणि त्यांना हटवण्यात आले होते. मात्र तो केवळ फार्स होता की काय असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. रत्नागिरी शहरात आता पुन्हा अवैध टप-या, भाजी विक्रेते, फळ विक्रेते जिकडे तिकडे बसू लागले आहेत. त्यामुळे शहराच्या विदृपतेमध्ये वाढ होत आहे. शिवाजीनगर, साळवी स्टॉप, मजगाव रोड, चर्मलय स्टॉप, राजिवडा, जेलनाका फूटपाथ, एस.टी.स्टैंड, बाजारपेठ आदी सर्वच ठिकाणी टप-या,भाजी विक्रेते, फळ विक्रेते बसलेले दिसून येत आहेत. या सर्वांना नगर परिषदेने अधिकृत तर नाही ना केले? गतवर्षी केलेली कारवाई नेमकी कशासाठी होती? तीच कारवाई आताही होणार का?, अतिक्रमण विभागातील अधिकारी नेमके काय करतात? असे असंख्य सवाल उपस्थित केले जात आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनीच आता जातिनिशी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. 

Comments