शासनाने काढलेल्या मच्छीमारांच्या हितासाठी नविन सुधारित कायद्याच्याबाजुने पारंपारीक मच्छीमार एकवटणार
रत्नागिरी प्रतिनिधी
अनधिकृत पर्ससीन आणि एलईडी मासेमारी करणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने काढलेल्या नविन सुधारीत कायद्याच्या विरोधात पर्ससीननेट मच्छिमार संघटनेने उपोषण सुरु केले आहे. शासनाने काढलेल्या मच्छीमारांच्या हितासाठी नविन सुधारित कायद्यामुळे पारंपारीक मच्छीमारांना दिलासा मिळाला असून रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार आता या कायद्याच्या बाजूने उभे राहण्यास सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा माच्छीमार संघटनेचे अध्यक्ष आणि रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री. राजन सूर्वे यांची रत्नागिरी शहरातील आणि तालुक्यातील पारंपारीक काही प्रमुख मच्छीमारानी भेट घेतली. रत्नागिरी जिल्हा मच्छीमार नौका चालक-मालक संघटनेने रत्नागिरी जिल्हामध्ये अनधिकृत पर्ससिन आणि एलईडी मासेमारी करणाऱ्यांच्या विरोधात पारंपारिक मच्छिमारांच्या बैठका व आंदोलने करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. रत्नागिरी तालुक्यामध्ये पर्ससीन धारकांनी उपोषण सुरू केले असल्यामुळे पारंपारीक मच्छिमारांनी कायद्याच्या बाजुने उभे राहून लवकरच शासनाला त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गावा गावातून निवेदने देण्याचे ठरवीण्यात आले. त्यावेळी श्री. नामदेव शिरगावकर, श्री भाऊ शिरगावकर, श्री. दिलावर गोदड, श्री. पिंकु बिजे, श्री. कंचु मयेकर, श्री, शंकर शिवलकर, श्री. अंकुर नार्वेकर. श्री. विशाल मुरकर, श्री. छोट्या भाटकर, श्री. दत्तगुरू कीर, श्री. प्रविण आमरे, श्री. गोट्या नार्वेकर, श्री, अनुप वारंग, श्री अमित विलणकर, श्री बापू माईन आदी प्रमुख मच्छीमार उपस्थीत होते.
Comments
Post a Comment