माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने घेतला गळफास!!

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या नातीने गळफास घेतल्याचं समोर आलंय. सौंदर्या असं तीचं नावं होतं. बेंगळुरूतील एका खासगी अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. तिच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे.

ही आत्महत्या आहे की हत्या, याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला आहे. लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम सुरू असल्याची माहिती येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने दिली आहे.

पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवायला सुरुवात केली आहे. अद्याप मृत्यूचं कारण (mystery)अस्पष्ट असल्याने संपूर्ण प्रकरणाचं गूढ कायम आहे. त्यामुळे ही आत्महत्या असल्याची अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

बीएस येडीयुरप्पांनी कर्नाटकचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. शिकारीपुरा या मतदारसंघातून ते कर्नाटक विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहतात.

कर्नाटकात आतापर्यंत चार वेळा मुख्यमंत्री आणि तीन वेळा कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हे कार्य करणारे ते एकमेव राजकारणी आहेत. ते शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा मतदारसंघातून आमदार आहेत. या मतदारसंघातून ते आठ वेळा निवडून आले आहेत.

Comments