कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
चिपळूण:
मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला हा अपघात सोमवारी रात्री घडला. तेजस बाळाराम गुरव (रा. कामथेखुर्द ) असे या मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
तेजस का आपल्या ताब्यातील दुचाकीने लोटे येथील सुप्रिया केमिकल कंपनीतून कामावरून घरी येत असताना कामथे येथे आला असता एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली हा अपघात इतका गंभीर होता की या अपघातात तेजसचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच येथील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष समीर काझी यांनी ग्रामस्थांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. तेजसच्या मृत्यूने कामथे खुर्द परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
Comments
Post a Comment