कोकण कृषी विद्यापीठातील १० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील १० विद्यार्थी
कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

महाविद्यालयातील १२० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या १० विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून सौम्य
लक्षणे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून, यातील सातजणांना एनसीसी कॅम्पसाठी सहभाग घ्यायचा असल्याने आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना सध्या विद्यापीठातील स्वतंत्र इमारतीमध्ये
विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
पुढील तीन दिवस ऑनलाइन क्लासेस सुरु राहणार आहेत. तशा सूचना सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर यांनी दिल्या आहेत. १० जानेवारीनंतर पुन्हा टेस्ट करण्यात येणार आहेत.

Comments