रत्नागिरीतील काळबादेवी समुद्रकिना-यालगत होतय वाळू उत्खनन, प्रशासनाची परवानगी आहे का? नसेल तर प्रशासन काय कार्यवाही करणार?

रत्नागिरी तालुक्यातीळ काळबादेवी समुद्रकिना-यालगत मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन होत आहे. वाळूचे मोठमोठे ढिग या भागात किनायालगत दिसून येत आहेत. या वाळू उत्खननाला गौण खनिज विभागाची अथवा तहसिल कार्यालय महसूल विभागाची परवानगी आहे का? शासन नियमानुसार अधिकृत परवाने दिले गेले आहेत का? पर्यावणाशी संबंधित काही नियम आहेत का? असतील तर तशी आवश्यक परवानगी घेतली गेली आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत. काळबादेवी गावाला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. इथे अनेक पर्यटक येत असतात. मात्र या किना-यालगत वाळू उत्खनन कोण करते? अधिकृत वाळू विक्री होतेय का?त्याचे काही कर असतात का? त्यांची पूर्तता संबंधितांकडून होतेय का? असे उलट सुलट सवाल उपस्थित केले जात आहेत. 

Comments