भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, साप्ताहिक बलवंतच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*

*भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, साप्ताहिक बलवंतच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*

*रत्नागिरी* : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि साप्ताहिक बलवंतच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ऑनलाइन होणार आहेत. सुदृढ बालक स्पर्धा, निबंध, चित्रकला स्पर्धांचा यात समावेश आहे.

यामध्ये सुदृढ बालक स्पर्धा होणार आहे. यामध्ये वयोगट वय वर्षे ६ महिने ते ३ वर्ष आणि ३ वर्षे ५ वर्षे असे दोन गट आहेत. याकरिता स्पर्धकाचे नाव, जन्मदिनांक, वजन, उंची, फोटो, मोबाईल नंबर पाठवावा. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकास रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र आणि सर्व गटांमध्ये पहिले बक्षीस 1000 रुपये, दुसरे बक्षीस 750 रुपये, तिसरे बक्षीस 550 रुपये आणि सहभागी सर्व स्पर्धकांना 100 रूपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

चित्रकला स्पर्धेमध्ये पहिली ते दुसरीच्या गटासाठी राष्ट्रीय फुल कमळ आणि तिसरी व चौथीच्या गटासाठी राष्ट्रीय पक्षी मोर या विषयावर चित्र पाठवावे. पाचवी ते सातवीच्या गटासाठी भारतमाता, सैनिक हे विषय आहेत. पाचवी ते सातवीच्या गटासाठी हस्ताक्षर लेखन स्पर्धाही आहे. यामध्ये मराठी पुस्तकातील कोणताही एक परिच्छेद हस्ताक्षर लेखनासाठी निवडायची आहे.

आठवी ते दहावीच्या गटासाठी चित्रकला स्पर्धेत विविधतेत एकता यावर चित्र काढायचे. तसेच जगाचा पोशिंदा शेतकरी यावर निबंध लिहायचा आहे. अकरावी व बारावीच्या गटासाठी निबंध स्पर्धा होणार आहे. याकरिता स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांचे योगदान, माझ्या स्वप्नातील स्वातंत्र्योत्तर भारत, उत्सव स्वातंत्र्याचा, स्वातंत्र्य चळवळीत रत्नागिरी जिल्ह्याचा सहभाग असे विषय आहेत. खुल्या गटासाठी रांगोळी स्पर्धा होईल. यामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा विषय दिला आहे.

स्पर्धेसाठीचे नियम- चित्र ए फोर आकाराच्या कोऱ्या कागदावर काढावे. निबंध स्वतः लिहिलेला व स्वहस्ताक्षरात असावा. निबंध मराठी भाषेतच लिहिलेला असावा. निबंधाची शब्द मर्यादा माध्यमिक विभाग ५०० शब्द व उच्च माध्यमिक १००० शब्दमर्यादा आहे. निबंध ए फोर आकाराच्या कागदावर लिहिलेला असावा. निबंधाच्या खाली स्वतःचे पूर्ण नाव, शाळेचे नाव, मोबाईल नंबर लिहावा. स्पर्धकाने निबंधामध्ये कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. इतरत्र प्रकाशित झालेला मजकूर निबंधात आढळल्यास तो निबंध ग्राह्य धरला जाणार नाही. स्पर्धकाचा रांगोळी स्पर्धेच्या फोटोबरोबर स्वतःचा फोटो असावा. सुदृढ बालक, चित्रकला, निबंध स्पर्धा, फोटो, इत्यादी व्हॉटसअपवर पाठवताना शक्यतो सर्व साहित्य पीडीएफ स्वरूपात बनवून पाठवावे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

व्हॉटसअप क्रमांक 9359167084 व 8888262701 या क्रमांकावर स्पर्धेकरिता साहित्य पाठवावे. नोंदणी तारीख 10 जानेवारी 2022
असून साहित्य पाठविण्यासाठी अंतिम तारीख 20 जानेवारी 2022 आहे. या स्पर्धांचे बक्षीस वितरण २५ जानेवारीला करण्यात येणार आहे. यासंबंधी नंतर माहिती जाहीर करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन साप्ताहिक बलवंतच्या मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक सौ. माधवी सुरेंद्रनाथ माने यांनी केले आहे.

खालील फॉर्ममध्ये स्पर्धकांनी माहिती भरावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScS203Cp3ON50mk_WYxPs8X8iTUuR2waOUH6vfILct3tK5WUA/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0

Comments