संगमेश्वर तालुक्यातील पाणलोटच्या कामांची चौकशी करण्यात यावी: सभापती जयसिंग माने यांची जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मागणी
संगमेश्वर तालुक्यातील पाणलोट अंतर्गत झालेली विविध कामांचे ठेके जिल्हा बाहेरील ठेकेदारांना मिळाले आहेत. याचे नेमके कारण काय आहे. काही कामे प्रत्यक्षात झालेली देखील नाहियेत. यातील काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने यान्नी रत्नागिरी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केली. तसेच संगमेश्वर पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकींमध्ये तालुका कृषी अधिकारी हजर राहत नाहित. त्यांना वारंवार सुचना केल्या जातात. मात्र बैठकींना ऊपस्थित राहत नाहित. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. किंवा आवश्यक त्या सुचना देण्यात याव्यात अशीही मागणी सभापती जयसिंग माने यानी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केली.
Comments
Post a Comment