आजचे राशीभविष्य - 7 जानेवारी 2022
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १७, १९४३. तिथी : पौष शुक्ल पंचमी. (सकाळी ११.११ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४३, प्लव नाम संवस्तर, नक्षत्र : दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री सकाळी ६.२० पर्यंत पूर्वा भाद्रपदा, त्यानंतर उत्तरा भाद्रपदा. रास : दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ००.१५ पर्यंत कुंभ, त्यानंतर मीन. आज : सामान्य दिवस. राहू काळ : सकाळी १०.३० ते १२. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)
मेष - लाभदायक ग्रहमान आहे. मनासारखे जगता येईल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यातून नवीन संधी मिळेल. घरात प्रसन्न वातावरण राहील. आर्थिक आवक समाधानकारक राहील. अनपेक्षितपणे काही लाभ होतील.
वृषभ - घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मनात सकारात्मक व उत्साही विचार राहतील. नोकरीत नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. काहींना पदोन्नती मिळू शकते. कामाचे स्वरुप बदलेल. मुलांच्या यशामुळे घरात आनंदी वातावरण राहील.
मिथुन - विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. काहींना भेटवस्तू मिळतील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील, प्रवासात फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. नोकरी, व्यवसायात ठिकठाक स्थिती राहील. नावलौकिकात भर पडेल.
कर्क - अकल्पितपणे धनप्रात्पी होईल. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकलता आले तर बरे. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. प्रवासात सावधानता बाळगा. तब्येतीच्या बाबतीत बेपर्वाई नको.
सिंह - थोरामोठ्यांच्या सहवासात राहाल. जवळपासचे प्रवास होतील. घरात गैरसमज होतील. नोकरीत कामाचा ताण राहील. त्यामुळे थोडा थकवा जाणवेल. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.
कन्या - जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. नोकरीत प्रगतीला पोषक वातावरण राहील. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. आर्थिक लाभ होईल. व्यवसायात तुमचे अंदाज बरोबर ठरतील. विरोधकांना पुरून उराल. आरोग्याच्या बाबतीत बेपर्वाई नको.
तूळ - आपल्यावर धनलक्ष्मीची कृपा राहील. व्यवसायात विक्री चांगली होईल. नफ्याचे प्रमाण वाढेल. प्रवासकार्य साधक ठरेल. जवळच्या नातेवाईकांच्या भेटी होतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मुलांना अपेक्षित संधी मिळेल. त्यांचे हट्ट पुरवावे लागतील.
वृश्चिक -घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. पूजापाठात मन रमेल. आर्थिक आवक चांगली राहील. एखाद्याचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. नोकरीत प्रगती होईल. काहींना एखादी नवीन जबाबदारी घ्यावी लागेल.
धनू - प्रवास कार्य साधक ठरतील. घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. व्यवसायात विक्री चांगली राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती असेल. जुन्या नातेवाईकांच्या, काही जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासमवेत वेळ जाईल.
मकर - आर्थिक आवक मनासारखी राहील. मौजमजेसाठी पैसे खर्च कराल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य ठरेल. एखाद्या सौद्यात यश मिळेल. महत्त्वाचे निरोप येतील. करार-मदार होतील.
कुंभ - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जोडिदाराशी नात्यात गोडवा राहील. महत्त्वाचे निरोप येतील. एखादे अडलेले काम मार्गी लागेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. सहकाऱ्यांशी वाद होतील.
मीन - आर्थिक लाभ होतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. प्रवासाचे योग येतील. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. त्यामुळे वेळ आणि पैसा यांचा अपल्यय होणार नाही. मनस्पात पण होणार नाही. आवडत्या छंदासाठी वेळ काढा.
Comments
Post a Comment