विमानांना 5G सेवेचा धोका? एअर इंडियाचा मोठा निर्णय, अमेरिकेची १४ उड्डाणे रद्द!
नवी दिल्ली : एअर इंडियासह अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी अमेरिकेला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत किंवा 5G वादामुळे वापरात असलेली विमाने बदलली आहेत. नवीन 5G मोबाइल फोन सेवेचा विमान तंत्रज्ञानावर परिणाम होऊ शकतो आणि या चिंतेमुळे विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत. विमान कंपन्यांच्या या निर्णयानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
जगभरात वापरल्या जाणार्या बोईंग 777 या विमानांवर नवीन हाय-स्पीड वायरलेस सेवेचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा आम्हाला देण्यात आल्याचे काही एअरलाइन्सने सांगितले. पण उड्डाणं रद्द केल्याने विमान सेवेवर किती परिणाम होईल हे स्पष्ट नाही. आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी फक्त वेगवेगळी विमाने वापरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अनेक एअरलाइन्सने म्हटले आहे.
अमेरिकेत 5G इंटरनेट सेवा सुरू केल्यामुळे ते भारत-अमेरिकेदरम्याची विमानसेवा चालवणार नाही, असे एअर इंडियाने ट्विट केले आहे. एअर इंडियाच्या या विमानांमध्ये दिल्ली-न्यूयॉर्क, न्यूयॉर्क-दिल्ली, दिल्ली-शिकागो, शिकागो-दिल्ली, दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को, सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली, दिल्ली-नेवार्क आणि नेवार्क-दिल्ली यांचा समावेश आहे. दरम्यान, आताच हाती आलेल्या माहितीनुसार बोईंग कंपनीने बोईंग 777 या विमानांच्या अमेरिकेतील वाहतुकीला कुठलाही धोका नसल्याचं सांगत परवानगी दिली आहे. यानंतर अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या पहिल्या विमानाचे आज सकाळी उड्डाण झाले, असं एअर इंडियाने म्हटले आहे.
अमेरिकेत 5G इंटरनेट सेवेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एअरलाइन्सशी चर्चा करत आहे, असे भारतीय विमान वाहतूक नियामक डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार म्हणाले. दूरसंचार कंपन्या AT&T आणि Verizon Communications ने म्हटले आहे की विमानतळांजवळ नवीन वायरलेस सेवा सुरू करण्याचे काम पुढे ढकलले जाईल.
यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने विमानतळांवर उड्डाण करण्यासाठी 5G सिग्नल असलेल्या अनेक विमानांच्या उड्डाणांना मंजुरी दिली आहे. पण बोईंग 777 या यादीत नाही. अमेरिकेत या समस्येने FAA आणि विमान कंपन्यांना फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन आणि दूरसंचार कंपन्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. विमानाच्या रेडिओ अल्टिमीटरवर 5G च्या प्रभावामुळे इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टम थांबू शकतात. यामुळे धावपट्टीवर विमानं रोखण्यात समस्या येऊ शकते, असे FAA ने नुकतेच म्हटले आहे.
Comments
Post a Comment