देशात 237 दिवसांतील सर्वांधिक सक्रिय बाधितांची नोंद

   

    नवी दिल्ली : देशातील करोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी 3 लाख 37 हजारांची दैनंदिन वाढ झाली. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या वाढून 21 लाख 13 हजारांवर पोहचली. सक्रिय बाधितांची ती संख्या 237 दिवसांतील सर्वांधिक ठरली आहे.

एकूण बाधितांमध्ये सक्रिय बाधितांचे प्रमाण 5.43 टक्के इतके आहे. देशातील बाधित बरे होण्याचा दर घटून 93.31 टक्के इतका झाला आहे.

दैनंदिन बाधित दर 17 टक्क्यांवर आहे. देशभरात आतापर्यंत 71 कोटींहून अधिक करोनाविषयक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात करोना लसीकरण मोहीमही वेगात सुरू आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या लसींच्या डोसची संख्या 162 कोटींच्या घरात पोहचली आहे.


Comments