जिल्ह्यात 23 जानेवारी रोजी पोलिओ लसीकरण मोहीम
रत्नागिरी जिल्ह्यात २३ जानेवारीला ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात येणार आहे. आरोग्यासह सर्व विभागानी जिल्ह्यात पोलिओ लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी करावी,
असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी केले आहे.
पल्स पोलिओ कार्यदल समितीची बैठक डॉ. जाखड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शिक्षणाधिकारी डॉ.अस्मिता मजगांवकर, फुले रोटरी क्लब, लायन्स क्लब,
सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment