रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कॉंग्रेसचा 20 टक्के वाटा आहे कुठे? राज्यात महाविकास आघाडी मग नियोजन समितीचा निधी का मिळत नाही: कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्त्यांची तिव्र नाराजी
रत्नागिरी प्रतिनिधी:-
राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. पण शासनाकडून निधी मंजूर होताना कॉंग्रेस पक्षाचा विचार होत नाही. रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर होणारी विकास कामांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा वाटा आहे तरी कुठे अशा तिव्र शब्दात जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाने मागणी केलेली विकास कामे मंजूर होत नसल्याने पालकमंत्र्यांच्या विरोधात उपोषण छेडण्याचा इशारा रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसने दिला आहे. रत्नागिरी कॉंग्रेस भुवन येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत कॉंग्रेस सरचिटणीस व माजी विधान परिषद आमदार अॅड.हुस्नबानू खलिफे, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, महिला कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस रुपालीताई सावंत, राजापूरचे नगराध्यक्ष जमीर खलिफे, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, संगमेश्वर तालुकाध्यक्ष दत्ता परकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव, राजापूर तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर आदी उपस्थीत होते.
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर होणा-या निधी मध्ये 20 टक्के वाटा कॉंग्रेस पक्षाला मिळाला पाहिजे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. मात्र रत्नागिरी कॉंग्रेसने सुचविलेली कामे मंजूर होत नाहित. यामुळे रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment