चिपळूण:त्या मुलाला 2 डोस दिलेले नाहीत, रुग्णालयाचा खुलासा

चिपळूण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुसमध्ये एका विद्यार्थ्याला दोनदा डोस देण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र याबाबत आरोग्य विभागाने या मुलाला दोनवेळा डोस
देण्यात आलेला नसल्याचा खुलासा केला आहे.

फुरुस रुग्णालयात कोविड-19 लसीकरण सत्र जानेवारी रोजी घेण्यात आले. या लसीकरणादरम्यान 15 ते 18 वयोगटातील एक विद्यार्थी लस देत असतानाच घाबरुन गेल्यामुळे तो उठून उभा राहिला, त्यामुळे त्याला सुई टोचल्यासारखे वाटले. त्यामुळे त्याला पुन्हा जागेवर बसवून लस टोचण्यात आली, असे प्राथमिक आरोग्य केंद्र
फुरुस येथील वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले.
सदर विद्यार्थी घाबरुन गेल्यामुळे या विद्यार्थ्याला देखरेखीकरिता डॉक्टरांच्या निगरानीखाली उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे ठेवण्यात आले आहे. कोविड -19 लसीकरण सत्रामध्ये कोणालाही एकाच वेळी दोन वेळा डोस देण्यात आलेला नाही. तसेच सदर दिवशी लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांचा पाठपुरावा केला असता, देण्यात आलेल्या लसीचा त्रास कोणालाही झालेला नाही असे प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस येथील वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले आहे.

Comments