महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे रविवारी 16 जानेवारी रोजी खेळाडू आणि मार्गदर्शक यांच्यासाठी फिजिओथेरपिस्ट डॉ.अमित रावटे यांचे ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे खेळाडू आणि मार्गदर्शक यांच्यासाठी फिजिओथेरपिस्ट डॉ.अमित रावटे यांचे ऑनलाईन मार्गदर्शन रविवारी (ता.16) सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे ऑलिम्पिकवीर पै. स्व. खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस क्रीडादिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निमित्ताने महाराष्ट्र खो खो असोसिएशनने खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यासाठी ऑनलार्ठन मार्गदर्शन कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये अनुभवी तज्ञ फिजिओथेरपिस्ट डॉ. अमित रावटे हे मार्गदर्शन करणार आहेत. वेगवान खेळ म्हणून खो-खो कडे पहिले जाते. हा खेळ जागतिकस्तरावर खेळला जात असून तो लाल मातीमधून मॅटवर पोचला आहे. त्यामुळे दुखापती टाळणे हे खेळाडू आणि प्रशिक्षकांपुढे आव्हान आहे. दुखापतीनंतर करावयाच्या उपाययोजना यावर डॉ. आवडे मार्गदर्शन करणार आहेत. याचा जास्तीत जास्त खेळाडू व मार्गदर्शकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा खो-खो चे सर्वेसर्वा अजितदादा पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळकर, खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, सचिव अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, संदिप तावडे आणि राज्य असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. ऑनलाईन मार्गदर्शनासाठी
https://us04web.zoom.us/j/9227609818?pwd=Z29JaTZ4SmdNanlJZGN4RE1vZDVzdz09 ही लिंक असून इमेल आयडी 922 760 9818 तर पासवर्ड mkka असा आहे.
Comments
Post a Comment