15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण आठवड्यातून दोन वारी होणार

दिनांक 03 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांचे कोविड-19 लसीकरण राज्यांमध्ये सुरु करण्याबाबत शासनस्तरावरुन सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण आठवड्यातून दोन वार म्हणजेच बुधवार व शनिवार या दोन दिवशी घेण्यात येत आहे. सदरच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करण्यात येणार आहे.  
          हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना दिनांक 10 जानेवारी 2022 पासून प्रिकॉशन डोस देण्यात यावा.
           60 वर्षे वा वरील सहव्याधी असलेल्या व्यक्तिंना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने दिनांक 10 जानेवारी 2022 पासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाउंटवरून प्रिकॉशन डोससाठी नोंदणी करता येईल. ज्या लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे, त्याच लसीचा प्रिकॉशन डोस देण्यात येईल. दुसऱ्या डोसनंतर 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेला लाभार्थीच प्रिकॉशन डोससाठी पात्र ठरुन त्यांनाच प्रिकॉशन डोस देण्यात येईल.
            कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना व त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना मा.श्री.बी.एन.पाटिल जिल्हाधिकारी रत्नागिरी, मा.विक्रांत जाधव अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.उदयजी बने उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य व बांधकाम समिती, जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ.अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी जिल्हावासियांना केलेल्या आहेत. या केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. त्याचप्रमाणे 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना कोविड-19 प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे. या कोविड-19 लसीकरणाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देण्याचे आवाहन मा.विक्रांत जाधव अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी व मा.उदयजी बने उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य व बांधकाम समिती, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी नागरिकांना केले आहे. 
          नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, फिजिकल डिस्टंसिंगचा वापर करावा, नियमीत मास्कचा वापर करुन योग्य वेळी सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच नागरिकांमध्ये केलेल्या लसीकरणामध्ये १०० टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण होईल याकडे लक्ष देऊन व त्यानंतर ज्या लाभार्थ्यांचा दुसरा डोस राहिला आहे तो प्राधान्याने पूर्ण करण्याचे आवाहन डॉ.अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केले आहे.

Comments