आर.डी.सी.सी.बँकेचे संचालक अजित यशवंतराव यांच्या हस्ते कोंडीवळे गावातील विविध विकास कामांची भूमिपुजने संपन्न

रत्नागिरी प्रतिनिधी:-
राजापूर तालुक्यातील कोंडीवळे येथे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कोंडीवळे कासारवाडी - कातळवाडी रस्ता डांबरीकरण करणे. रक्कम रु.१०.०० लक्ष तसेच कोंडीवळे कासारवाडी जि.प.शाळा ते सोनू बावकर घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे कामाचा भूमिपुजन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा रत्नागिरी जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक अजित यशवंतराव यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी ओबीसी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष श्री.चंद्रकांत बावकर, गावकार सोनु बावकर, तालुकाध्यक्ष आबा आडिवरेकर, नगरसेवक संजय ओगले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अभिजीत राजेशिर्के, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष मनिष लिंगायत, पं.स.समिती प्रतिक मटकर, युवक क्षेत्राध्यक्ष राजेश झोरे, चुनाकोळवण उपसरपंच मटकर, ग्रा.पं सदस्या रेश्मा जानस्कर, भारती, माजी सरपंच अनंत बावकर, समिर तुळसणकर, देवू नागम, सखाराम बावकर,चंद्रका़त जानस्कर, राजेश पालकर, सुरेश भारती, जयवंत भारती, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments