झपाट्याने वाढू लागलेत Omicron चे प्रकरणं, या 16 राज्यांमध्ये आतापर्यंत आढळले रुग्ण!जाणून घ्या सांख्या

नवीन Omicron प्रकारातील वाढत्या प्रकरणांमुळे चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी, 5 राज्यांमध्ये ओमिक्रॉनची 87 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. आज तामिळनाडूमध्ये 33, महाराष्ट्रात 23, तेलंगणात 14, कर्नाटकात 12, गुजरातमध्ये 7 आणि केरळमध्ये 5 रुग्ण आढळले आहेत. यानंतर, नवीन प्रकाराने संक्रमित रुग्णांचीीसंख्या देशभरात 355 झाली आहे.
ओमिक्रॉनची सर्वाधिक 88 प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. 64 प्रकरणांसह दिल्ली दुसऱ्या तर तेलंगणा 38 प्रकरणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही प्रकरणे 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदवली गेली आहेत. मात्र, यातील 104 जण संसर्गमुक्त झाले आहेत किंवा इतर ठिकाणी गेले आहेत ही दिलासादायक बाब आहे.

तामिळनाडूमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग सुरू

दुसरीकडे, तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यम यांनी सांगितले की, तामिळनाडूमधील 33 नवीन ओमिक्रॉन रुग्णांपैकी (Patients) 26 चेन्नईमध्ये, एक सेलममध्ये, चार मदुराईमध्ये आणि दोन तिरुवन्नमलाईमध्ये आढळले आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. काही लोकांच्या जीनोम सिक्वेन्सिंगचे निकाल येणे बाकी आहे. निकाल लागल्यानंतर संख्या वाढू शकते.

रात्री कर्फ्यू आणि मोठ्या मेळाव्यावर बंदी घालण्याच्या सूचना

देशातील ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अनेक मार्गदर्शक तत्त्वे आणि उपाययोजना अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत. ओमिक्रॉनची नवीन प्रकरणे रोखण्यासाठी केंद्राने राज्यांना रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा आणि मोठ्या मेळाव्यासाठी कठोर नियम सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच केंद्राने राज्यांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवावर स्थानिक निर्बंधांचा विचार करण्यास सांगितले आहे.

Comments