MPSC नोकरभरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एमपीएससीकरता वाढीव संधी, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई :
नोकरभरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा देता येत नसल्याने वयोमर्यादा वाढवण्याची मागणी होत होती. त्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आता एमपीएससीसाठी एक वाढीव संधी देण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतलाय. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता अंमलात असल्याने याबद्दलचा जीआर 10 ते 15 डिसेंबर दरम्यान काढण्यात येईल. कोविडमुळे गेल्या दोन वर्षापासून एमपीएससी आणि सरळसेवेच्या भरती प्रक्रिया होऊ शकल्या नव्हत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे दोन वर्ष झालेल्या नाहीत. अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढलेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवा अशी मागणी होती. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. 


महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे 18 ते 20 लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या असते चार ते पाच हजार. मात्र वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग कधीच करत नाही. मागील दोन वर्षांपासून आधी राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट राहिल्यानंतर कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झालेल्याच नाहीत. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्षाच्या परीक्षेसाठी अंदाजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. MPSC ची 2021साठी राज्यसेवा परीक्षा 2 जानेवारी 2022 ला होणार आहे. तसेच 2022 ची राज्यसेवा परीक्षा जून आणि ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 2021 वर्षाची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी आणि मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 आणि 9 मे, 2022 रोजी असेल. परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे.



२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8999088923

Comments