केंद्र सरकारच्या राज्यस्तरीय दिशा (DISHA )समितीवर संतोष गांगण यांची नियुक्ती


भाजप नेते संतोष गांगण यांची टेलिकॉम सल्लगार समिती सदस्य पदावर नियुक्ती झाल्यानंतर वर्षभर रत्नागिरी जिल्ह्यात मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी व डिजिटल क्रांती घडवीण्यासाठी मेहनत करीत आहेत. सदर कार्याची व इतर सामाजिक कामाची दखल घेऊन मा. खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केंद्रीय ग्रामीण मंत्राल्याच्या दिशा (DISHA )या अत्यंत महत्वाच्या राज्यस्तरीय समितीसाठी तात्कालीन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्री. नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे शिफारस केली. सदर प्रस्तावाची केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाच्या विविध विभागातून छाननी झाल्यानंतर केंद्रीय गामीण विकास मंत्री श्री. गिरीराज सिंह यांनी श्री संतोष गांगण यांची महाराष्ट्र राज्य स्तरीय दिशा *DISHA* समिती सदस्य पदी नियुक्ती केली.
सदर राज्य स्तरीय समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री, उपाध्यक्ष ग्रामविकास मंत्री, प्रत्येक राजकीय पक्षाचा एक लोकसभा खासदार, राज्यसभा खासदार, विधानसभा सदस्य व अशासकीय सदस्य अशी समितीची रचना असतें. त्यात अशासकीय सदस्य म्हणून श्री. गांगण यांची नियुक्ती झाली असून राज्यात *अ* वर्ग अधिकारी दर्जाचा प्रोटोकॉल असणार आहे.
       सर्वांगीण दृष्टीकोन स्वीकारून शाश्वत, एकात्मिक आणि वेगवान ग्रामीण विकासासाठी समान उद्दिष्ट असलेल्या केंद्राच्या विविध मंत्रालयांच्या विविध कार्यक्रमांच्या तथा योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच संसद, राज्य विधीमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था (पंचायती राज संस्था/नगरपालिका संस्था) मध्ये सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्यात कार्यक्षम आणि उत्तम समन्वय सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती (दिशा) ची २७ जून २०१६ ला केंद्र सरकारने स्थापना केली. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत असलेल्या सुशासनाच्या दृष्टीने देशातील प्रत्येक गावाच्या विकासात्मक कार्यक्रमांचे प्रभावीपणे निरीक्षण करण्यास आणि नियोजन स्तरावर योग्य सुधारणांसाठी फीडबॅक देण्यासाठी समिती सक्षम असते.
केंद्र सरकारचे कार्यक्रम/योजना कार्यक्षम आणि पारदर्शक रीतीने कार्यान्वित केल्या जातील आणि लाभ गरीबांपर्यंत विनाअडथळा पोहोचतील याची खात्री करण्यासाठी सदस्याची महत्त्वपूर्ण देखरेखीची भूमिका असते.
केंद्र सरकारच्या विविध २३ मंत्रालयांच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना,
राष्ट्रीय कृषी विकास, प्रधानमंत्री उज्वला योजना, संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास
योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्वशिक्षा अभियान, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, स्मार्ट सिटी मिशन, दीनदयाळ अंत्योदय योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी अश्या विविध ४३ योजना तथा कार्यक्रमांचा समावेश सदर समिती अंतर्गत होतो. योजना तथा कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी,निरक्षण दक्षता व सुधारणा विषयी राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक करणे सदर समिती सदस्याचे मुख्य काम असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दिशा समितीच्या बैठकीत सहभागी होऊन केंद्र सरकारच्या राज्यात राबाविल्या योजनाची वस्तुस्थिती मांडता येते आणि त्यातून जनहिताचे प्रभावी निर्णय घेता येतात.

Comments