आजची रेसीपी:मिश्र कडधान्याची धिरडी

साहित्य:
• १ कप वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मी मुग, मटकी, कबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे वापरले होते.)
• ३ ते ४ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार
• १ टीस्पून जिरे
• १/४ कप तेल
• १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
• चवीपुरते मीठ

 

कृती:
•सर्व कडधान्ये एकत्र करून पाण्यात ८ ते १० तास भिजवावीत. पाण्याची पातळी साधारण ३ ते ४ इंच वर असावी.
• कडधान्ये नीट भिजली कि त्यातील न भिजलेली, कडक राहिलेली कडधान्ये वेचून काढून टाकावीत.
• स्वच्छ केलेली कडधान्ये कापडात बांधून मोड यायला उबदार जागी ठेवावी. ७ ते १० तासांनी मोड येतील
• मोड आले कि मिक्सरमध्ये कडधान्ये, मिरच्या, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून किंचित भरडसर राहील असे फिरवावे. इडली पीठाएवढे घट्ट असावे.
• चिरलेली कोथिंबीर, जिरे आणि मीठ (लागल्यास) घालावे.
• नॉन-स्टीक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घालावे. डावभर पीठ घालून ते जमेल तेवढे पातळ पसरवावे. आच मध्यम ठेवावी. झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी. नंतर झाकण काढून धीरड्याच्या कडेने तेल सोडावे. बाजू पालटून दुसरी बाजूही नीट शिजू द्यावी.
• टोमॅटो केचप किंवा आवडीचे तोंडीलावणे घेउन गरमच खावे.

Comments