भारताचा दक्षिण अफ्रिकेवर ११३ धावांनी दणदणीत विजय

मालिकेत १-० ने आघाडी

दक्षिण अफ्रिकेच्या सेंच्युरिअन मैदानात भारताने पहिला कसोटी विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील भारताने ११३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. आता भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली. पाचव्या दिवशी भारताने दक्षिण अफ्रिकेचे ६ गडी झटपट बाद केले. जसप्रीत बुमराहने ३, मोहम्मद शमीने ३, मोहम्मद सिराजने २ आणि आर. अश्विनने २ गडी बाद केले.

आफ्रिकेच्या एल्गरने १५६ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या. एडन मारक्रम (१), डीन एल्गर (७७), किगन पीटरसन (१७), रस्सी वॅनदर दुस्सेन (११) आणि केशव महाराज (८), क्विंटन डिकॉक (२१), वियान मल्डर (१), मार्को जॅनसन (१३) धावा करून बाद झाले. कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांना खातंही खोलता आले नाही.


Comments