रेल्वे पोलिसांचे दुर्लक्ष,कोकण रेल्वेत चोऱ्यांचे प्रमाण वाढले!!

महिलेचे दागिने लुटले,५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला, कणकवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण,रात्रीचा प्रवास ठरतो चोरणासाठी फायदेशीर

रेल्वे प्रशासन,रेल्वे पोलीस मात्र सुस्थ,प्रवासात दागिने वापरण्यास महिलांमध्ये भीतीचे

कणकवली :
कोकण रेल्वे मार्गावरील एर्नाकुलम – ओखा एक्स्प्रेस मधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. या पर्समध्ये ५ लाख १८हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच रोख ९००० रुपये असा ५ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता. ही घटना रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मागील काही महिन्यात वारंवार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेमध्ये प्रवाशांच्या मौल्यवान दागिन्यांचे मोबाईल व इतर वस्तूच्या चोरीचे प्रमाण वाढले असल्याने आता पोलीसाकडून या चोरीचा छडा लावण्याची गरज आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमीला प्रभाकर तळेकर (६०,रा. फोंडाघाट ,गडगेसखलवाडी ) या पतीसह मुंबई येथे अधून मधून जातात. ६ डिसेंबर रोजी रात्री त्या मुंबई , वसई येथून आपल्या गावी येण्यासाठी एर्नाकुलम – ओखा एक्सप्रेस (क्रमांक ०६३३७ ) या गाडीतून रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास निघाल्या. त्यांचे भाऊ शिवराम दत्ताराम सावंत (५०) हे त्यांच्या सोबत गावी येणार असल्याने पनवेल येथे ते गाडीत बसले. एस -४ या डब्यात ती दोघे बसली होती. मंगळवारी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथे थांबा असल्याने गाड़ी हळू झाली. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती प्रमिला यांच्या बाजुला येऊन उभी राहीली. तसेच त्यांच्या हातातील लाल रंगाची पर्स त्याने खेचली व तो पळायला लागला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो त्यांच्या हातातून निसटला व चालत्या गाडीतुन उडी मारून पळून गेला.

प्रमिला यांनी आरडाओरड केली असता डब्यातील इतर लोक जागे झाले. त्यानी संबधित चोरटयास पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सापडला नाही . त्यावेळेस रेल्वे स्थानकावर टी.सी. कींवा रेल्वे पोलिस नसल्याने त्या तिथे तक्रार नोंदवू शकल्या नाहीत. त्या गाडीतुनच पुढे कणकवली येथे आल्यावर कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

Comments