विराटने कर्णधारपद सोडले की त्याची हकालपट्टी केली? निवड समितीच्या बैठकीत नेमकं काय झालं?

विराटने कर्णधारपद सोडले की त्याची हकालपट्टी केली? निवड समितीच्या बैठकीत नेमकं काय झालं?

मुंबई : 
माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ जाहीर केला. तसेच सलामीवीर रोहित शर्माची एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ३ महिन्यांतच हा निर्णय घेण्यात आला. पण कोहलीने वनडे संघाचे कर्णधारपद सोडले की त्याची हकालपट्टी करण्यात आली, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

बोर्डाने फक्त घोषणा केली, तो निर्णय कोहलीचा
या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी असा दावा केला की, कोहलीने मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता, बीसीसीआयने फक्त त्याची घोषणा केली. बाबर आझमनंतर सध्या जगातील नंबर २ एकदिवसीय फलंदाज असलेल्या कोहलीने जवळपास २५ कसोटी डावांमध्ये एकही शतक झळकावलेले नाही आणि सध्या तो टॉप-५ क्रमवारीतून बाहेर आहे.

विराटला कर्णधारपदातून विश्रांतीची गरज
सूत्रांनी सांगितले की, “कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे त्याचा खूप वेळ जात होता, त्यामुळे त्याला या ब्रेकची गरज होती. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास त्याला या निर्णयाचा फायदा होईल. जे त्याच्यासाठी सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरीकडे, रोहित शर्मावर कर्णधार म्हणून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे. एकदिवसीय आणि टी-२० मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला हा ३४ वर्षीय खेळाडू बऱ्याच काळापासून कर्णधारपदासाठीच्या शर्यतीत राहिला आहे.

रोहितवर विश्वास
रोहित शर्माने टी-२० प्रकारामध्ये मुंबई इंडियन्ससाठी पाच इंडियन प्रीमियर लीग (IPL)ची विजेतेपदे जिंकून आपली क्षमता सिद्ध केली आहे, तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये उपकर्णधार म्हणून त्याची कामगिरी प्रभावी आहे. कर्णधार होण्याच्या शर्यतीत तो नेहमीच आघाडीवर राहिला आहे. त्याने कसोटीतही आपल्या कामगिरीने सर्वांना आकर्षित केले. टॉप-५ फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. त्यामुळे त्याची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदीही नियुक्ती करण्यात आली आहे.

रोहितने प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केले
सूत्रांनी पुढे सांगितले की, 'रोहितने स्वत:ला वेळोवेळी सिद्ध केले आहे. जेव्हा तुम्ही सातत्याने अशी कामगिरी करता तेव्हा काहीतरी बक्षीस मिळालेच पाहिजे. त्याची वेळ येईपर्यंत तो तसाच फलंदाज राहू शकला असता, पण आता त्याच्याकडे नवीन भूमिका आहे. तो खूप काही करण्यासाठी तयार असेल.'


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8999088923


Comments