शिव खाडीपट्टा भागात बेसुमार वाळू उपसा



खेड:
खेड तालुक्यातील शिव खाडीपट्टा विभागातून वाहणाऱ्या जगबुडी नदी ते खाडी किनाऱ्यावर पावसाळ्यात वाहून आलेल्या उत्तम दर्जाच्या वाळूची शासनाला कोणताही महसूल न देता चोरी करण्याचा प्रकार सुरू आहे. या बेसुमार वाळू उपशाकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याने शासनाने निर्धारित केलेल्या गौण खनिज उत्खनन कायद्याचे राजरोसपणे उल्लंघन होत आहे. या प्रकाराला रोखणार कोण, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
शासनाचे गौणखनिज उत्खननाबाबत अस्पष्ट असलेले धोरण कोकणातील नदीपात्रात होणाऱ्या अवैध वाळू उत्खननाला पोषक ठरले आहे. गौणखनिज उत्खननातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळविण्याची संधी आहे. मात्र, याकडे महसूल खातेच फार गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. जगबुडी ही तालुक्यातील बारमाही प्रवाही नदी असून पावसाळ्याचे चार महिने वगळता उर्वरित कालावधीत या नदीच्या शेवटच्या भागात मोठ्या प्रमाणात वाळूचा नैसर्गिकरीत्या साठा उपलब्ध होतो. या साठ्याच्या उत्खननातून शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होऊ शकतो; परंतु गौणखनिज विभागाच्या उदासीन व अस्पष्ट धोरणामुळे गेले काही वर्षे हा महसूल बुडत आहे. मात्र, शासनाच्या तिजोरीत महसूल जमा होत नसला तरी काही लोकांच्या खिशात अवैध वाळू उपशामुळे कोट्यवधी रुपये जमा होत असल्याची चर्चा आहे.
जगबुडी नदी व खाडी भागातील भरतीच्या वेळा वगळता ओहोटीच्या कालावधीत नदीपात्रात जेसीबी, ट्रॅक्टर डंपर आदी आधुनिक यंत्र सामुग्रीचा उपयोग करू कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याच्या खुणा अलसुरे, शिव, निळीक व भोस्ते आदी परिसरात आढळून आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी महसूल,पोलिस व जिल्हा खनिकर्म विभाग तसेच संबंधित यंत्रणेला तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या वाळू उपशाकडे लक्ष द्यावे,अशी या भागातील लोकांची मागणी आहे.



२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8999088923



Comments