राजापूरातील शिवणे खुर्द येथील उत्कर्ष विद्यामंदिरला पावस येथील आशिष किर यांच्या माध्यमातून वॉटर प्युरीफायर भेट
रत्नागिरी प्रतिनिधी:-
राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत उत्कर्ष विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयाला पावस येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष किर यांनी स्व खर्चातून दोन वॉटर प्युरिफायर भेट म्हणून देण्यात आले. नुकतेच हे दोन वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आले. शिवणे खुर्द येथील सुधाकर गोर्ले व देवाचे गोठणे येथील विनायक दिक्षीत यांच्या माध्यमातून आशिष किर यांची भेट झाली. त्यानंतर या प्रशालेला हे दोन वॉटर प्युरिफायर भेट म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमावेळी शिवणे खुर्द शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम गोर्ले, ग्रामीण कार्यकारिणी अध्यक्ष काशिनाथ गोर्ले, अमोल बोळे, श्री शेट्ये आदींसह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment