पालकमंत्री अनिल परबांवर रामदास कदमांचा घणाघाती आरोप

“अनिल परबांना एसटी कामगारांसाठी वेळ नाही पण रामदास कदम आणि त्यांच्या मुलाला राजकारणातून संपवण्यासाठी तीन दिवस ते रत्नागिरीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. तिथे सभा घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आणि सूर्यकांत दळवीसोबतच्या माणसांना पद देण्यात आले, असा घणाघाती आरोप रामदास कदम यांनी केला.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मला विश्वास आहे उद्धव ठाकरेंना याची कल्पना नसेल. योगेश कदमने रश्मी ठाकरेंसोबत यासंदर्भात संवाद साधला आणि हे उद्धव ठाकरेंना सांगण्याची विनंती केली. योगेश कदमने अनिल परबांसोबतही संवाद साधला पण त्यांची भाषा अशी आहे की ते जसे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ज्यांनी शिवसेना तिथे मोठी केली त्यांनाच आता तिथे बाजूला करण्यात आले आहे.

Comments