संविधानाच्या प्रस्तावनेत भारतातील नागरिकांचे प्रतिबिंब

 संविधानाच्या प्रस्तावनेत भारतातील नागरिकांचे प्रतिबिंब

रत्नागिरी : चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर येथे 'आपण आणि संविधान' या विषयावर ॲड. संध्या सुखटणकर यांनी व्याख्यान दिले. त्यांनी भारतीय संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तरुण पिढीने सजग राहून संविधानाचा आदर व पालन करणे, भारताचा सुजाण नागरिक म्हणून गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भारताच्या संविधानातील तरतुदी, वेळोवेळी त्यात झालेल्या सुधारणा, सर्वसमावेशक घटनेची देशाला सार्वभौम राष्ट्र म्हणून अस्तित्त्व देण्याची ताकद, सत्तेचे विकेंद्रीकरण, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, भाषावार प्रांत रचना, संविधान लिहिणाऱ्या समितीचा उद्देश व राष्ट्रहितसंबंधी दूरदृष्टिकोन या संदर्भात त्यांनी विस्तृत माहिती दिली. संविधानाची प्रस्तावना हा संविधानाचा आरसा आहे ज्यात भारतातील नागरिकांचे प्रतिबिंब सामावले आहे, असे त्या म्हणाल्या.

२ लाख हून अधिक वाचक
57०+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8999088923

Comments