पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांना अर्थसहाय्य देण्याच्या अनुषंगाने धनादेशाचे वितरण

महिला व बालविकास विभागाच्या दिनांक 17 जून 2021 च्या शासन निर्णयानुसार कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना रुपये पाच लाख अर्थसहाय्य देणेबाबत योजना जाहीर केले आहे. या योजनेच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते रत्नागिरीतील पाच बालकांना लाभाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. सदर योजनेचा उद्देश असा अनाथ झालेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांचे पुनर्वसन करणे व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विकासासाठी सहाय्य करणे हा आहे या योजनेत बालक व शासन यांच्या संयुक्त खात्यावर पाच लाख रुपये इतके अनुदान जमा होणार असून ते मुदत ठेव स्वरूपात बालकाच्या वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत ठेवण्यात येणार आहे मुदत ठेवीत नोंदवण्यात आलेली मूळ रक्कम व त्यावरील व्याज बालकाच्या वयाची एकवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालकाला मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात covid-19 च्या काळात अनाथ झालेल्या पाच बालकांचे व शासनाचे संयुक्त खाते बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत उघडण्यात आले असून सदर खात्यात प्रत्येक बालकाच्या नावे रुपये पाच लाख जमा झाले आहेत. ती रक्कम मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यात आली आहे. सदर योजनेच्या धनादेशाचे वितरण करताना रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, माजी आमदार संजय कदम आदी उपस्थित होते.

Comments