काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, शस्त्रास्त्रे जप्त
श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्येमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोघेही दहशतवादी संघटना जैशशी संबंधित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, चौगाममध्ये शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीत ‘लश्कर’चे दोन दहशतवादी मारले गेले. ब्रारीपोराच्या सज्जाद अहमद चेक आणि पुलवामातील राजा बासित नजीर अशी दाेघांची नावे आहेत.
चाैगाममध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. पोलिसांनी आणि सेनेच्या संयुक्त पथकाने परिसरात शोधमोहिम सुरू केली. दहशतवाद्यांनी जवानांवर गाेळीबार केला. सुरक्षादलाच्या जवानांनीही चाेख प्रत्युत्तर दिले. चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
Comments
Post a Comment